Thursday, November 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedत्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याने भारताचा नागरिक म्हणून बजावला मतदानाचा हक्क

त्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याने भारताचा नागरिक म्हणून बजावला मतदानाचा हक्क

गोंदिया : जिल्हाधिकारी प्रजित नायर, तत्कालीन पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा  यांचे समक्ष गोंदिया जिल्हा पोलीसांना आत्मसमर्पण केलेला आणि पूर्वाश्रमीचा भारत सरकार विरोधात नक्षल चळवळीत सहभागी होवून शस्त्र उगारून नक्षलवादी झालेला संजय उर्फ बिच्चेय सुकलु पुनेम यांनी गोंदिया जिल्हा पोलिसांना आत्मसमर्पण केल्यानंतर सर्वसामान्य जिवन जगत विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्यावर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये भारताचा नागरीक म्हणून मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सदर आत्मसमर्पित माओवादी याने घर सोडल्यापासून त्याचेकडे कोणतेही कागदपत्र पुरावे नव्हते त्यामुळे कागदपत्र नसल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, तसेच सध्या कार्यरत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे निर्देश मार्गदर्शनात आत्मसमर्पण व पुर्नवसन समिती, नक्षल सेल गोंदिया जिल्हा यांचे सहकार्याने अथक परिश्रम प्रयत्नांनी त्याचे आवश्यक कागदपत्र उदा. वोटर कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड इ. तयार करण्यात आले आणि त्यास शासनाच्या विवीध योजनाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. सदरचे कागदपत्राचे आधारावर सदर माआवाद्यांने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सदर माओवाद्यास शासनाचे विविध योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस सतत सर्वतोपरी मदत करित आहे. वरिष्ठांनी त्याने भारतीय लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून भारताचा नागरिक म्हणून आपले अमूल्य मतदान केल्याबद्दल त्याचे अभिनंदन, कौतुक केले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी याद्वारे नक्षल चळवळीत सहभागी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होवून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले जीवन सुखकर करावे आणि चांगले जीवन जगावे असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments