Saturday, June 7, 2025
Google search engine
HomeUncategorizedदेवरी आरटीओ चेकपोस्टवरील सहा. आरटीओ खैरनार एसीबीच्या जाळ्यात

देवरी आरटीओ चेकपोस्टवरील सहा. आरटीओ खैरनार एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील देवरी आरटीओ चेकपोस्ट नाक्यावर कार्यरत सहा.परिवहन अधिकारी खैरनार यांना नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना आज ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.मिळालेल्या माहितीनुसार देवरी चेकपोस्टवर अवैधरित्या वाहनचालकाकडून वसुली केली जात असल्याची तक्रार वाहनचालकांनी केलेली होती,त्यानुसार एका ट्रेलरच्या वाहनचालकाला आपल्या वाहनात बसवून नाशिक एसीबीचे अधिकारी ट्रेलरचे वाहनचालक म्हणून चढले आणि चेकपोस्टवर पोचताच पैशाची मागणी झाली असता पैसे भरण्याकरीता कार्यालयातील खिडकीजवळ असलेल्या काऊंटरवर जाऊन पैसे देत असताना कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.सहा.परिवहन अधिकारी खैरनार यांच्यासोबत इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments