गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे, यांचे सुचनेप्रामणे अभय डोंगरे सा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी सा. उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षण प्रविण डांगे पोलीस स्टेशन देवरी यांनी हद्दद्दीतील इसम चुन्नीलाल रामाजी नंदेश्वर (वय ५२) रा मरामजीब, यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे सन २०१७ ते सन-२०२४ पर्यंत अवैध महाराष्ट्र दारूबंदी विक्रीमुळे गावातील कुटुंबे उध्वस्त होत असुन समाजातील नितीमत्ता खालावुन महिलांना व विदयार्थाना याचा नाहक त्रास होत असल्याने कविता गायकवाड, उपविभागीय दंडाधिकारी, देवरी यांच्याकडे कलम-५६ (ब) (ब) मपोका अन्वये हददपार करण्याचा प्रस्ताव सादर केले असता, त्यांनी चौकशी व सुनावणी करुन चुत्रीलाल रामाजी नंदेश्वर या अवैध दारू विक्रेत्यास जिल्हा गोंदिया या उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातुन ६ महिण्याकरीता हददपार करण्याचे आदेशित केल्याने सदर इसमास आदेशाची प्रत तामील करून दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातुन हददपार करण्यात आले आहे. पो. नि. प्रविण डांगे सा. यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करीता पो. हवा. धर्मराज कटरे, मपोशि निता कांबळे पोलीस स्टेशन देवरी, यांनी निर्गती केली आहे.
देवरी ठाणेअंतर्गत अवैध दारू विक्रेता तडीपार
RELATED ARTICLES