देवरी हायवेवर बस-ट्रक अपघात, एक ठार तर 43 जखमी

0
560

गोंदिया : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरी तालुक्यातील धोबीसराड शिवारात ४ डिसेंबर रोजी रात्री अंदाजे १२.१५ ते १२.३० दरम्यान ट्रक-ट्रॅव्हल्सची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून ४३ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस, महामार्ग पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे हलविले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे पाठविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रायपूरकडून नागपूरकडे जात असलेल्या सीजी १९ बी.एल. ८००१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सनी ट्रक (क्र. सीजी ०४ ५०९६) ला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवासी जखमी झाले. अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here