धान उत्पादक शेतक-यांना युरिया खत सहजतने उपलब्ध करा : आ. विजय रहांगडाले

0
179

गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धानपिक उत्पादक जिल्हा असून येथील शेतक-यांचा मुख्य व्यवसाय धान शेती हा आहे. शेतीचे उत्पादन वाढावे याकरिता शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खताचा वापर करीत असतो. परंतु त्यांना बाजारपेठेत युरिया सहजतेने उपलब्ध होत नाही.युरिया खत घेण्याकरिता कृषी केंद्रावर गेले असता युरिया खतासोबत इतर खत व नँनो डीएपी, नँनो युरिया घेण्याचे जबरद्स्तीने बंधनकारक करीत असतात. त्यामुळे शेतक-यांना आवश्यक नसलेले खत खरेदी करावे लागते. परिणामी आर्थिक भुर्दंड बसत असतो यामध्ये कृषी केंद्रधारकाचा कोणताही दोष नसून कंपनीमार्फतच त्यांना युरिया, मिश्र खते सोबत नँनो डीएपी, नँनो युरिया व इतर सूक्ष्म खताचा जबरीने पुरवठा केला जातो.ज्या केंद्रधारकांनी तक्रार केली की कंपनीमार्फत त्यांना कोणत्याही खताचा पुरवठा केला जात नाही. तसेच कृषी विभागामार्फत कृषी केंद्र धारकांना दोषी ठरवून कार्यवाही केली जाते असे निदर्शनास आले आहे. याशिवाय मागील सोमवार ते बुधवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे व घरांचे नुकसान झाले, यांचे तातडीने पंचनामे करण्याचे शासनस्तरावरून निर्देश देण्यात यावे, शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या शेतक-यांना अनुदानाचे वाटप करण्यात यावे आदी महत्वपूर्ण विषयावर आज तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी प्रश्न उपस्थित करुन शासनाचे लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here