धान खरेदीचे चुकारे दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात : माजी मंत्री राजकुमार बडोले 

0
162

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे येत्या दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासंदर्भात माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री मा. अजितदादा पवार आणि आदिवासी विकास मंत्री मा. अशोकजी उईके यांच्याशी थेट संपर्क साधून निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, लवकरच प्रलंबित शेतकऱ्यांना त्यांच्या धानाच्या खरेदीची रक्कम प्राप्त होणार आहे. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. राजकुमार बडोले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here