पं. स. समोर ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे व काम बंद आंदोलन

0
187

गोंदिया : शासन निर्णयाच्या विरोधात पंचायत समिती गोंदिया कडून ग्राम पंचायत अधिकारी यांच्या दाबावामध्ये येऊन कर्मचा-यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणारी फरकाची रक्कम जमा करण्या एैवजी ग्रामपंचायतच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रिये विरोधात आज २७ जून पासून ग्राम पंचायत कर्मचा्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला पंचायत समिती गोंदिया समोर सुरुवात केली आहे.आंदोलनाचे नेतृत्व कॉ.मिलिंद गणवीर,देवेन्द्र मेश्राम,विनोद सहारे,भाऊलाल कटंगकार,महेंद्र कटरे,राजेश भोकासे,महेंद्र भोयर,मुकेश बिसेन,सहेशराम माहुले,माणिक उके,रेखा सरनागत,सुनंदा दहीकर,व इतर कार्यकर्ते करत आहेत.ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या किमान वेतनाचा १९ महिन्याचा फरकाची रक्कम (वाढीव रक्कम ) गोंदिया पंचायत समिती मध्ये ग्राम स्वराज विभागातर्फे १४ मे २०२५ ला जमा करण्यात आली.हि रक्कम सरळ ग्राम पंचायत कर्माचा-यांचा बॅंक खात्यात जमा करण्याच्या शासन निर्णय आहे.परंतु गोंदिया पंचायत समितीकडून या निर्णयाचा उल्लंघन करून हि रक्कम ग्राम पंचायत बॅंक खात्यात जमा करणे,ग्राम पंचायत अधिकारी यांच्या आर्थिक फायदा घेण्याकरिता शासन निर्णयाच्या आंबलबजावणी न करून हि रक्कम ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा करणे म्हणजे ग्राम पंचायत अधिक-याचे हिताचे समर्थन करत आहे.या मागणीला घेऊन गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणा-या ११० ग्राम पंचायतीचे १६० ग्राम पंचायत कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here