Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedपोलिस पाटील भरतीत ओबीसीसाठी जागाच नाही

पोलिस पाटील भरतीत ओबीसीसाठी जागाच नाही

ओबीसी संघर्ष कृती समितीची ओबीसी आरक्षणाची मागणी
गोंदिया : उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार साले कसा आमगाव देवरी तालुक्यातील विविध ठिकाणी पोलीस पाटील पदाच्या नियुक्ती करिता आरक्षणाची सोडत ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या जाहीर यादीनुसार नुसार बिंदू नामावलीचे संदर्भ घेऊन आरक्षणाची सोडत करण्यात आलेली आहे. परंतु अनेक ओबीसी समाजातील पोलीस पाटील सर्वसाधारण जागेवर नियुक्त झाले होते ज्यांचा या मध्ये ओबीसी म्हणूनच गणना करण्यात आली असल्याने ओबीसीन करिता जागाच उरली नसल्याचे समोर आले. परंतु हे नियमबाह्य असून ओबीसी समाजावर अन्याय आहे. ओबीसी समाजातील उमेदवार सर्वसाधारण आरक्षणावर नियुक्त झाले तर त्यांना सर्वसाधारणच गण करायला हवी होती परंतु तसे न करता त्यांना सुद्धा ओबीसी धरून ओबीसींसाठी वेगळ्या आरक्षित जागांची संख्या शून्य असून संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय आहे अशी भूमिका ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.
पोलिस पाटील भरती मध्ये ओबीसी करिता एकही जागा राखीव नसल्याने ओबीसी प्रवर्गातील जनतेवर अन्याय झाले असल्याने याबाबत तात्काळ बदल करून ओबीसी करिता आरक्षण सकट परत भरती प्रक्रिया करावी अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे, तालुका अध्यक्ष मनोज डोये, ओबीसी सुरक्षा दल जिल्हा अध्यक्ष विजय फुंडे, नेपाल पटले, मनोज शरणागत, राजू काळे, राहुल हटवार, राकेश रोकडे, मधुकर हरीणखेडे, यशवंत शेंडे, गणेश शेंडे, राजू ब्राम्हणकर इत्यादी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments