Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedफत्तेपूर व टेमणी आरोग्य केंद्र,उपकेंद्राच्या श्रेयाचे राजकारण

फत्तेपूर व टेमणी आरोग्य केंद्र,उपकेंद्राच्या श्रेयाचे राजकारण

गोंदिया : राज्यसरकारच्या आरोग्य विभागाकडून तालुक्यात सध्या आरोग्य केंद्र व उपकेंद्राना मंजुरी मिळाल्याने सध्या आपण मंजुर केल्याची स्पर्धा सुरु आहे.आमदार विनोद अग्रवाल म्हणतात मीच केलेे.तर सामाजिक कार्यकर्ता अखिलेश सेठ यांचे म्हणने आहे की,टेमणी येथील आरोग्य केंद्राची मंजुरी मिळवून देण्यात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत नागपूरच्या अधिवेशनातच मंजूरी मिळवून दिली होती.मात्र विद्यमान आमदार आपल्याच प्रयत्नाने झाल्याचे सांगत बसल्याची चर्चा आहे.त्याचप्रमाणे तालुक्यातीलच फत्तेपूर येथे आरोग्य उपकेंद्राकरीता फतेपूरचे उपसरपंंच धनंजय रिनाईत यांनी १४ एप्रिल २०२२ पासून ग्रामपंचायत ठरावापासून तर सर्व प्रकिया पार पाडत जिल्हा परिषदेकडून मंजुरी घेत जिल्हा नियोजन समितीपर्यंत पाठपुरावा केलेला होता.त्यांच्या या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे फत्तेपूर येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments