Wednesday, June 4, 2025
Google search engine
HomeUncategorizedबालकामगार व वेठबिगार कामगार पध्दत निर्मुलनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन : निवासी उपजिल्हाधिकारी...

बालकामगार व वेठबिगार कामगार पध्दत निर्मुलनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन : निवासी उपजिल्हाधिकारी बेहेरे

गोंदिया : 18 वर्षाखालील बालकांना धोकादायक उद्योगात तसेच 14 वर्षाखालील बालकांना धोकादायक व बिगर धोकादायक उद्योगांध्ये कामावर लावणे शासकीय गुन्हा आहे. तसेच एखादया व्यक्तीचे इच्छेविरुद्ध वेठबिगारी  पध्दतीने काम करण्यास प्रवृत्त करणे हा वेठबिगार कामगार निर्मुलन अंतर्गत गुन्हा आहे. बालकामगार व वेठबिगार कामगार पध्दत गोंदिया जिल्हयातून नाहीसे करणेबाबत विविध शासकीय विभाग, सामाजिक संघटना व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया भैयासाहेब रामराव बेहेरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता समिती व बाल कामगार कृती दल यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सभेला  सहायक कामगार आयुक्त, गोंदिया, राजदीप मो. धुर्वे, Home Dysp.  नंदिनी चानपुरकर, प्रतिनिधी महिला व बालविकास विभाग गोंदिया रविंद्र टेंभूर्ण, समन्वयक ISWS गोंदिया दिपमाला भालेराव, तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी व अशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments