मंडल यात्रेच्या समारोपाला गोंदियात येणार प्रसिध्द विचारवंंत प्रा.लक्ष्मण यादव

0
257

यात्रेच्या नियोजन सदर्भात विश्रामगृहात पार पडली बैठक
गोंदिया : दरवर्षीप्रमाणे नागपूर येथून निघत असलेल्या मंडल यात्रेचा समारोपाचा मान यावेळी गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे.त्या निमित्ताने येत्या ७ आॅगस्ट २०२४ रोजी मंडल यात्रा समारोप कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून ओबीसी बहुजन विचारवंत प्रा.लक्ष्मण यादव हे गोंदियाला येत आहेत.त्या कार्यक्रमाच्या आयोजन निमित्ताने आज शनिवारला येथील विश्रामगृहात ओबीसी संघटना पदाधिकारी यांची बैठक पार पडली.बैठकिच्या अध्यक्षस्थानी ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे होते.या बैठकित मंडल यात्रेच्या गोंदिया जिल्ह्यातील मार्ग आणि कार्यक्रमाची रुपरेषा यावर चर्चा करुन प्रा.यादव यांचे विचार एैकण्याकरीता ओबीसी एसस्सी एसटी समाजबांधवासंंह ओबीसी विद्यार्थ्यांना कार्यक्रमात कशापध्दतीने आणता येईल यावर चर्चा करण्यात आली.तसेच ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीकरीता वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज प्रकिया सुरु झाल्याने ही माहिती सर्वापर्यंत पोचविण्यावर चर्चा करण्यात येऊन मंडल यात्रेचा समारोप यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले.कार्यक्रमाच्या खर्चाचेही नियोजन करण्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीला ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,अशोक लंजे,कैलाश भेलावे, उमेंद्र कटरे, जि.प.सभापती संजय टेंभरे,ओबीसी संंघर्ष समितीचे राजीव ठकरेले,सुनिल पटले,गौरव बिसेन,राजेश नागरीकर,ओबीसी सेवा संंघाचे भुमेश्वर ठाकरे,सी.पी.बिसेन,प्रमोदकुमार बघेले,भारतीय पिछडा शोषित संघटनेचे प्रेम साठवणे,संंविधान मैत्री संंघाचे अतुल सतदेवे, वशिष्ट खोब्रागडे बाबा बिसेन निशिकांत बंसोड़,प्रतीक पारधी, प्रमोद कोसरकर,बालू कोसरकर,श्री.कापगते यांच्यासह सर्व ओबीसी बहुजन संंघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here