Thursday, November 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedमतदान आवाहन चिट्ठी वाटप करुन जिल्ह्यातील 8 लाख 50 हजार मतदारांना मतदान...

मतदान आवाहन चिट्ठी वाटप करुन जिल्ह्यातील 8 लाख 50 हजार मतदारांना मतदान करण्याविषयी जनजागृती करणार : एम.मुरुगानंथम

गोंदिया : लोकशाही बळकट करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. ग्रामीण व शहरी भागात गाव पातळीवर मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रतिक नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी कंबर कसली असून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे सर्व विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहे.सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 “स्वीप” कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी ग्रामीण भागात मतदान वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन ग्राम पंचायत,शाळा व आरोग्य विभागाला विविध नाविण्यपुर्ण उपाययोजना राबविण्याच्या सुचना दिल्या होत्या त्या अनुशगाने सर्व विभागांनी व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. त्यात रांगोळी,बँनर,पोष्टर,प्रभातफेरी, मोटार बाईक व सायकल रँली असे विविध माध्यमांचा वापर करण्यात आला.
गावपातळीवरील लोकांनी दि.20 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त मतदान करण्याच्या दृष्टीकोनातुन शेवटचा अनोखा उपक्रम दि. 18 ते 19 ह्या दोन दिवसात राबविण्यात येत आहे.दि.18 रोजी एकाच दिवशी तब्बल 8 लाख 50 हजार मतदारांना मतदान आवाहन चिट्ठी वाटप करुन मतदान करण्याविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी दिली आहे.शासकिय शाळेतुन 2 लाख, खाजगी शाळेतुन 2 लाख, अंगणवाडी केंद्रातुन एख लाख 84 हजार,नगर परिषदेमार्फत शहरी भागात 32 हजार,राज्य परिवहन महामंडळ मार्फत प्रवासी यांना 20 हजार, रेल्वे विभागातुन प्रवासी यांना 10 ह्जार, माविम महामंडळातुन 10 हजार, पंचायत विभागातुन ग्रामस्तरावर 1 लाख 60 हजार, आरोग्य विभागातील बाह्यरुग्ण विभागातुन 25 हजार, पशु वैद्यकीय विभागातुन 20 हजार असे एकुण एकाच दिवशी 8 लाख 61 हजार मतदारांना मतदान आवाहन चिट्ठी वाटप करुन मतदान करण्याविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया स्वीप अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांपर्यंत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी “मतदान आवाहन चिट्टी वाटप “ दिनांक 18.11.24 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 उपक्रम राबवण्यात येणार आहे. मतदारांपर्यंत सादर चिठी आवाहन पोचेल याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यात सर्व विभागांना दिशानिर्देश देण्यात आले असुन ग्रामपंचायत योजनादूत, ⁠अंगणवाडी सेविका – विद्यार्थी संख्येप्रमाणे चिठ्ठी वाटप,शाळा – मार्फत प्रति विद्यार्थी संख्येप्रमाणे चिठ्ठी वाटप, प्राथमिक आरोग्य केंद्रातुन – बाह्यरुग्ण व नातेवाईक,नगर परिषद/ नगर पंचायत यांचे कडुन नागरिक,बस स्थानक मार्फत प्रवासी,माविम नगर परिषद यांचे कडुन नागरिक. या प्रमाणे संपूर्ण जिल्हाभर अंदाजे 8 लाख 61 हजार मतदान आवाहन चिठ्ठी दि. 18/11/24 ला सकाळी 10.00 वाजेपासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत वाटप करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली आहे.      जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक डिस्पेंसरी, नागरी आरोग्य केंद्र, आपला दवाखाना,नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र,आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांना दि.18 नोव्हेंबर सोमवारला वरील सर्व आरोग्य संस्थेत बाह्य रुग्ण विभागात /ओपीडी मध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना व नातेवाईकांना दि. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकरिता मतदान आवाहन चिट्ठी वाटप करुन जनजागृती करण्यात येणार असल्याची महिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments