Tuesday, November 18, 2025
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात आज सकाळी १० वाजतापासून पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत असून, अजूनही चकमक सुरू असल्याचे कळते.पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाने भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर अबुझमाड परिसरात नाक्षलविरोधी अभियान राबवले. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठासुद्धा जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, चकमक अद्याप सुरू असल्याचे कळते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments