‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानावर तिरखेडी जि.प.गटाचे वर्चस्व

0
188

गोंदिया : शैक्षणिक सत्र २०२३-२४ अंतर्गत सालेकसा पंचायत समितीमध्ये राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात सालेकसा तालुक्यातील तिरखेडी जिल्हा परिषद क्षेत्राने भरारी घेतल्याने सर्व सहभागी शाळांचे जिल्हा परिषद सदस्या विमल बबलू कटरे यांनी अभिनंदन केले आहे. स्तरिय निकाल आज (दि.२१) जाहीर करण्यात आला.
चालू शैक्षणिक सत्रात गेल्या १४ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान जिल्हा परिषद, शासकीय, खासगी अनुदानिक शाळांचे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा‘ या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेल्या कार्याचे मूल्यांकन तालुका मूल्यांकन समिती मार्फत करण्यात आले. या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांचे मूल्याकंन करून स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला.
यामध्ये जिल्हा परिषद शाळा गटातून जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा,बोदलबोडी मेहताखेडा प्रथम क्रमांक पटकावला.तर द्वितिय क्रमांक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गांधीटोला आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमिक शाळा गोर्रेने पटकावला.विशेष म्हणजे तिन्ही शाळा या जिल्हा परिषद क्षेत्र तिरखेडी अंतर्गत येत असल्याने या शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जि.प.सदस्य विमल कटरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here