Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी!, रुग्णांना 26 लक्ष 30 हजार...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी!, रुग्णांना 26 लक्ष 30 हजार रुपयांची मदत

गोंदिया : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आशेचा नवा किरण ठरला आहे. या निधीच्या माध्यमातून जवळपास 26 लक्ष 30 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य रुग्णांना देण्यात आले असून उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते.
सदर कक्ष ( मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय सहायता कक्ष) हा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राज्यातील प्रत्येक जिल्हयांमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. गोंदिया येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पहील्या मजल्यावर हा कक्ष सुरु असुन जिल्हाधिकरी प्रजित नायर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळत आहे. आवश्यक सर्व साहित्य व कक्षाच्या निर्माणमध्ये यांची महत्वपुर्ण मदत झाली आहे.
१ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उदघाटन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, सहाय्यक अधिक्षक संजय धार्मिक तसेच कक्षातील अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश येरपुडे, समाजसेवा अधिक्षक मारोती कुचनकर, लिपीक स्मिता शेटे तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते. दिनांक १ मे २०२५ पासुन कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश येरपुडे, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक मारोती कुचनकर, लिपीक स्मिता शेटे या कक्षामध्ये कार्यरत आहेत. तसेच अधिक माहितीकरीता रुग्णांनी 9518984292, 9960722268 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.

रुग्णांना देण्यात आलेली मदत पुढीलप्रमाणे
1.जानेवारी – 1 अर्ज 50 हजार रुपये
2. फेब्रुवारी – 3 अर्जांना २ लाख 40 हजार रुपये
3. मार्च – 7 अर्जांना 5 लाख २0 हजार रुपये
4. एप्रिल – 7 अर्जांना 5 लाख 2० हजार रुपये
5. मे – 15 अर्जांना 11 लाख 50 हजार रुपये
6. जून – 2 अर्जांना 1 लाख 50 हजार रुपये,
१३ जुलैपर्यंत – 35 अर्जांना 26 लाख 30 हजार रुपये.

१ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल केल्यास व कागदपत्रे पूर्ण असल्यास पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया

अर्जदारांनी निधीसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा स्थाननिश्चित (जीओ टॅग) केलेले छायाचित्रे, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक), तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे), आधारकार्ड, आजाराशी संबंधित निदानात्मक कागदपत्रे तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी पोलिसांचा एफआयआर, प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय समितीचा अहवाल अशी कागदपत्रे बंधनकारक आहेत. अर्जदारांनी ही कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत किंवा ई-मेलद्वारे पाठवावीत. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या साहाय्याने https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासता येते. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या वैद्यकीय मदत उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments