गोंदिया. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजनांचा आढावा घेतला.आढावा सभेदरम्यान आरोग्य निर्देशांक 100 टक्के पुर्ण करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने पावले उचलण्याच्या सुचना यावेळेस त्यांनी दिल्या.त्या वेळेस जिल्हास्तरिय आढावा सभेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे उपस्थित होते.
आढावा सभेदरम्यान सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन, हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, किटकजन्य आजार, हत्तीपाय रोग,अँनिमिया मुक्त भारत अभियान,संस्था प्रसुती,नियमित लसीकरण,कुपोषण, नवसंजीवनी योजना, साथरोग,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान,जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम,बाल सुरक्षा कार्यक्रम,कायाकल्प,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र योजना,बांधकाम,15 वित्तबाबी,आयुष,एनसीडी ई. विविध बाबींचा आढावा घेवुन मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या.जिल्ह्यात मातांना प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात आरोग्य सेवा देवुन सर्व आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुर्ण करणे तसेच लोकांना गुणात्मक सेवा देण्याबाबतच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी आरोग्य विभागाला यावेळी दिल्या. आढावा सभेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी,डॉ.ललित कुकडे,डॉ.निलेश जाधव,डॉ.स्वप्निल आत्राम,डॉ.सुकन्या कांबळे,डॉ.प्रणित पाटील, आयईसी विभागाचे प्रशांत खरात तसेच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व्हि.सी.द्वारे उपस्थित होते.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम योजनाचे जिल्हा समन्वयंक यांचा आढावा घेवुन मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी घेतला आरोग्याचा आढावा
RELATED ARTICLES






