मुख्य बस स्थानक गोंदिया येथे गुटखा-तंबाखू बाबत धाडसत्र, 1550 रुपयाचा दंड वसूल

0
240

गोंदिया : शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. दिनांक 25 जुन रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया च्या वतीने 1 मे ते 15 जून तंबाखू नकार दिनानिमित्त 45 दिवसाच्या अभियाना अंतर्गत गोंदिया येथील मुख्य बस स्थानक व आगार परिसरामध्ये धाडसत्र राबवुन धूम्रपान निषिद्ध क्षेत्राचा व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांचे पोष्टर वाटप करुन जनजागृती करण्यात आली.

मुख्य बस स्थानक व आगार परिसरामध्ये धाडसत्र राबवुन 15 तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्या कर्मचारी व लोकांकडुन तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करून 1550/‌- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,पोलीस उपनिरीक्षक अक्षय संपत वळसे,आगार व्यवस्थापक यतीश कटरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आजाद मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर,दंत तंत्रज्ञ यश जयस्वाल,दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांचेसह रामनगर पोलीस विभागाचे नितीन दिवटे व बोपचे यांनी पार पाडली.सदर धाडसत्र तंबाखू नकार दिनानिमित्ताने 1 मे ते 15 जून या 45 दिवसाच्या अभियाना अंतर्गत राबविण्यात आली.

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.सार्वजनिक सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे,त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here