Sunday, June 8, 2025
Google search engine
HomeUncategorizedमुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

गोंदिया : लहान मुलाच्या पिंडदान करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा कोरणी घाटातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ८ जून रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. मिरा ईसुलाल तुरकर (५५), मिनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मीता शत्रुघ्न टेंभरे (३९) तिन्ही रा. राजीवनगर वॉर्ड क्रमांक ४ हिंगना नागपूर अशी मृत महिलांची नावे आहेत.
मृतक मिरा ईसुलाल तुरकर यांच्या लहान मुलगा मुकेश तुरकर याचे निधन ३० मे २०२५ रोजी आजाराने झाल्याने त्याच्या पिंडदानासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर ८ जून रोजी दुपारी २ वाजता २० ते २५ लोक आले होते. दुपारी १२.३० वाजता पूजा करण्यापूर्वी आंघोळीसाठी महिला मंडळी घाटात उतरल्या. मुकेश तुरकरची वहीणी गायत्री राजेश तुरकर ह्या आंघोळ करीत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मिनाश्री संतोष बघेले (३६) हिने पाण्यात उडी घेतली. परंतु तिही बडून लागली. दोघ्याही बुडत असतांना पाहून स्मीता शत्रुघन टेंभरे (३०) हिने पाण्यात उडी घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती देखील पाण्यात बुडाली. तिघ्या बुडत असल्याचे पाहून मिरा ईसुलाल तुरकर (५५) ह्या त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असतांना या प्रयत्नात त्या स्वत:चा जीव गमावून बसल्या. या घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी घेतली आहे. तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments