मोहाडी ते चोपा रस्त्याची दुरावस्था, सार्व.बांधकाम विभाग व जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष

0
220

रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा- सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे
गोंदिया – गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ते चोपा रस्त्यावर खड्याचे साम्राज्य पसरले आहे या मार्गाने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे विशेष म्हणजे मागील चार महिने अगोदर अर्धवट सिमेंट रस्ता बांधकाम करूण ठेकेदार पसार झाला आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या मोहाडी ते चोपा या तीन किलोमीटर रस्त्यावर मधोमध मोठ मोठे खड्डे च, खड्डे पडले असुन प्रवासी नागरिक, शालेय विद्यार्थी, व्यवसायिक, नोकरदार व शेतकरी मजुर ना तारेवरची कसरत करून वाहन काढावे लागतात सिमेंट रस्ता बांधकाम व रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे. या मागणीचे निवेदन २५ सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाला मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी मागणी केली आहे. मोहाडी ते चोपा हा तीन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर कित्येक निवासी घरे सुध्दा आहेत. सदर मार्गाने रात्रंदिवस अनेक प्रवासी प्रवास करीत असतात या मार्गाने हलके व जड वाहने दर दिवस जात असतात रहदारी युक्त रस्ता असल्यामुळे या रस्त्याकडे कित्येक वर्षांपासून संबंधित बांधकाम विभाग व जनप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासाचे जीव टांगणीला आले आहे या खड्ड्यांमुळे कित्येक प्रवासांना अपघात ला समोरे जावे लागले आहे. परिसरातील नागरिकांनी संबंधित बांधकाम विभाग व जनप्रतिनिधीं विरूध्द रोष व्यक्त केला जात आहे एखादी अनुचित घटना घडल्यास संबंधित विभाग जबाबदारी स्वीकारेल का??? असा उपस्थित होत आहे. तरी अर्धवट असलेल्या सिमेंट रस्ता बांधकाम त्वरित करण्यात यावे व रस्त्यावर मधोमध पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केली आहे.

मोहाडी ते चोपा हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता असुन मागील चार महिने अगोदर संबंधित ठेकेदाराने तीनशे मीटर सिमेंट रस्ता बांधकाम करूण उरलेला रस्ता अर्धवट सोडुन पसार झालेला आहे, या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असुन शालेय विध्यार्थी व प्रवासी नागरिकांना प्रवास करताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डा कि खड्डयात रस्ता अशी अवस्था झाली आहे. तरी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे व अर्धवट असलेला रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे.
नरेंद्र कुमार चौरागडे,सरपंच ग्राम पंचायत मोहाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here