Saturday, September 7, 2024
Google search engine
HomeUncategorizedरतनारा परिसरात अवैध गौणखनिजाचे जोमात उत्खनन, शासकीय यंत्रणा आंधळी

रतनारा परिसरात अवैध गौणखनिजाचे जोमात उत्खनन, शासकीय यंत्रणा आंधळी

गोंदिया : गोंदिया तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील अन्य भागात सुध्दा गौणखनिज उत्खननावर वाळू, दगड, मुरूमाचा बेकायदा उपसा आणि चोरटी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्या अनेक महिन्यापासून धापेवाडा ते गोंदिया व रायपूर-रतनारा-गोंदिया मार्गावर दरदिवसाला मुरुम घेऊन जाणार्या ट्रकची संख्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे.सकाळपासून सायकांळपर्यंत मुरूम वाहतूकीचा अधिकृत परवाना नसतानाही वाहन जात असताना त्यावर कारवाई मात्र केली जात नाही.त्यामुळे गोंदिया तालुक्यातील गौणखनिजाचा मोठा महसूल या चोरटी वाहतूक व उत्खननातून बुडत आहे.रतनारा येथील 5-7 टिप्पर व जेसीबीचा मालक असलेला एक इसम जिल्हा परिषदेच्या शासकीय तलाव,निलागोंदी परिसरातील खासगी व्यक्तीच्या तलावातून आणि कोहका परिसरातील तलावातून उत्खननाची कुठलीही परवानगी नसताना खुलेआम मुरुमाची चोरी करीत आहे.विशेष सदर व्यक्तीच्या टिप्परचे शेवटचे क्रमांकही हे सारखेच असून एका खासगी तलावातील जागेवर उत्खननाची परवानगी तलाठ्याकडून घेतलेली नसतानाही मुरुमाचे उत्खनन मोठ्याप्रमाणात करीत असल्याचे दिसून आले.
पोलीस विभागाच्यावतीने मध्यतंरी अवैध गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करण्यात आली,मात्र महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून कारवाई करण्यात आल्याचे कुठेच दिसून येत नाही.
गोंदिया तालुक्यातील रतनारा परिसरात असलेल्या शासकीय जिल्हा परिषदेच्या तलावातून अवैधरित्या रात्रीला व पहाटेच्या सुमारास रतनारा येथीलच एका टिप्पर व्यवसायिकांने अवैध उत्खनन केल्याचे पाहणीत समोर आले.त्याचप्रमाणे निलागोंदि परिसरातील एका खासगी तलावातूनही मुरुममातीचे अवैध उत्खनन करतांना आढळून आले.उत्खनन करतेवेळी सदर वाहनचालकाने खासगी मालमत्ता असून परवानगीची गरज नसल्याचे सांगत जमीन मालकाच्या परवानगीने खोलीकरण करीत असल्याचे सागंत टाळण्याचा प्रयत्न केले.याच परिसरात रायपूर,कोहका, निलागोंदि,सेजगाव परिसरात मोठ्याप्रमाणत उत्खनन झाल्याने पहाडे ओसाड झाली आहेत तर तलाव व जमिनीवर मोठमोठ गढ्डे उत्खननामुळे दिसून येत आहेत.
जिल्ह्यात खदानींतून दगडाचा उपसा करण्यासाठी परवाना देण्यात आला नाही, तरीही दगड, खडीची वाहतूक करण्यात येते. शासनाच्या आदेशानुसार गौण खनिजांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.मात्र या भरारी पथकाने गेल्या सहा महिन्यात काय केले अशा प्रश्न निर्माण झालेला आहे.
रतनारा परिसरात सुरु असलेल्या उत्खननाबाबत या परिसराचे तलाठी बाळासाहेब साखरे यांना विचारणा केल्यावर आपल्याकडे कुणीही उत्खननाची परवानगी मागितली नसल्याचे सांगितले.तसेच या भागातून मुरुम घेऊन वाहन जात असल्याचे लक्षात आल्यामुळे आपण दोन दिवसापुर्वीच तहसिलदारांना पत्राद्वारे सुचना दिल्याचे सांगितले.

गोंदिया तालुक्यात गेल्या वर्षभरात कुणालाही गौणखनिज मुरुम माती उत्खननाकरीता खासगी व्यक्तीला परवानगी देण्यात आलेली नाही.मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता लागत असलेल्या माती व मुरुमाकरीता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रस्ता बांधकाम कंपनीलाच फक्त परवानगी शासकीय धोरणानुसार देण्यात आली आहे.
– नायब तहिसलदार प्रकाश तिवारी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments