Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedराजाभोज जयंती समारोह रेखलाल टेंभरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न

राजाभोज जयंती समारोह रेखलाल टेंभरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न

गोरेगाव : तालुक्यातील गणखैरा टोला येथे दरवर्षीप्रमाणे 7 व्या वर्षी छत्रिय राजाभोज जयंती समारोह भाजप नेते रेखलाल टेंभरे यांच्या अध्यक्षतेत पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाला जिप क्षेत्राचे भाजप प्रमुख रमेश ठाकूर, सटवाचे सरपंच अर्चनाताई ठाकूर, पुरगावचे उपसरपंच रहांगडाले, गणखैराचे उपसरपंचे लिखन पारधी, गणखैराचे माजी सरपंच खुन्निलाल पारधी, माजी पं.स. सदस्य केवल बघेले, ओंकार कटरे आदी मान्यवर उपस्थित होते. चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी त्यांच्या पराक्रमाने राज्य निर्माण केले. समाज बांधवांनी राजाभोज यांचे आदर्स अंगीकारून समाजपयोगी कार्य करावे असे आव्हान भाजपा नेते रेखलाल टेंभरे यांनी केले. मागील सात वर्षांपासून गणखैरा टोला येथे समाज बांधवांच्यावतीन राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजाभोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. यानंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219
००००००००००००००

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments