गोंदिया : रेल्वेच्या धडकेत 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील पदमपुर परिसरातील घटना असून तुकाराम मेश्राम वय 60 वर्ष रा. बोरकन्हार तालुका आमगाव जिल्हा गोंदिया असे मृतक वृद्धाचे नाव आहे.
पोलीस सूत्राच्या माहितीनुसार आज आमगाव तालुक्यातील पदमपुर परिसरातील रेल्वे रुळावर मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या नागरिकांना रेल्वे रुळावर एक अनोळखी इसमाचा मृत्युदेह दिसले असता त्यांनी या घटनेची आमगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळतात आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी संबंधित पोलिस हवालदार उदेराम उईके तसेच सहायक फौजदार यशवंत सयाम यांना घटनास्थळावर पाठविले संबंधित पोलीस घटनास्थळावर पोहोचले असता त्यांनी मृतदेहाची सहानिशा केली व नंतर आजूबाजूच्या नागरिकांना माहिती दिली.
मृतक तुकाराम हे रात्रीला आपल्या कुटुंबासह घरी झोपले होते परंतु घरच्या मंडळींनी सकाळीच तुकाराम ला खाटेवर पाहिले असता ते खाटेवर दिसले नाही त्या अनुषंगाने तुकारामच्या कुटुंबीयांनी गावामध्ये इकडे तिकडे शोधा शोधा केली पण त्यांच्या कुठेही थांब पत्ता लागलेला नव्हता. पण त्यांना माहित पडले की पदमपुर परिसरात रेल्वे रुळावर एक इसमाचा मृत्यूदेह मृतवस्थेत आढळलेला आहे. ते पाहण्याकरिता त्यांचे कुटुंब त्वरित घटनास्थळावर पोहोचले असता त्यांचा मुलगा सुखचंद तुकाराम मेश्राम यांनी मृत्यूदेहाला ओळखले की हे त्यांचेच वडील आहे. त्या अनुषंगाने आमगाव पोलिसांनी व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्युदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार उदेराम उईके व यशवंत संयम करीत आहे.
रेल्वेच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील पदमपुर परिसरातील घटना
RELATED ARTICLES