गोंदिया : कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना,गुन्ह्यांचा तपास,आंदोलने,मोर्चे,व्हीआयपीचे दौरे, नक्षलविरोधी गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते.या कारणाने त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही.या सर्व गोष्टींच्या विचार करून 12 जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांनी व्यायाम विषयक मार्गदर्शन त्यासोबत पोलिसांची आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक विलास काळे यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना नियमित बीपी शुगर व इतर चाचण्या करण्याबाबत सूचना केल्या. एकूण 25 पोलीस कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत भौतिकोपचारतद्य डॉ. कांचन भोयर द्वारा व्यायामा विषयक मार्गदर्शन करण्यात आले.तंबाकु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू खाण्यामुळे होणाऱ्या आजारांची माहिती सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर यांनी दिली व सर्व रुग्णांना कर्मचाऱ्यांना तंबाखू न खाण्याची शपथ देण्यात आली. नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले यांनी नेत्रदानविषयी माहिती दिली.लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील 12 कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम स्टाफनर्स निधी मिश्रा, महालॅब सहाय्यक कुणाल रहांगडाले,राधिका घोटेकर, लाचलुचपत विभागातील अतुल तवाडे,उमाकांत उगले, चंद्रकांत करपे, संजय कुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे,अशोक कापसे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलाश काटकर,संगीता पटले, रोहिणी डांगे दीपक बाटबर्वे यांनी सहाय्य केले.



