Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedलाडकी बहिण योजनेसह इतरही योजनांची कामे खोळंबली, महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन शुरू

लाडकी बहिण योजनेसह इतरही योजनांची कामे खोळंबली, महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन शुरू

गोंदिया : महसूल कर्मचार्‍यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सोमवार 15 जुलैपासून संघटनेच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाचे पडसात जिल्ह्यातही पहावयास मिळत आहे. आंदोलनामुळे मुलांच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात आवश्यक कागदपत्रे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची कामे आज खोळंबल्याचे पहावयास मिळाले. याचा फटका जनसामान्यांना बसणार आहे.
राज्यभरात महसूल कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरण्यासोबतच आकृतिबंद तयार करण्यात यावा यासह विविध प्रलंबित मागण्यांकरिता राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी 10 जुलैपासून आंदोलनाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून काम करण्यात आले. दुसर्‍या दिवशी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले. शुक्रवार 12 रोजी लेखणीबंद आंदोलन निमित्ताने जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासह ग्रामीण भागातील महसूल कार्यालयात शुकशुकाट होता. याचा फटका तहसील कार्यालय व महसूलशी सबंधित कार्यालयामध्ये कामासाठी येणार्‍या जनसामान्यांना बसला. आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश महसूल कर्मचारी सहभागी होत असल्याने लाडकी बहीण योजनेतील महिलांना याचा फटका बसणार आहे. शिवाय जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखले, उत्पन्नाचे दाखले याचे प्रस्ताव ऑनलाईन सादर होत असले तरी महसूल सहाय्यकांमार्फत ते प्रस्ताव पुढे नायब तहसीलदारांकडे पाठविले जाणार नाहीत. गौण खनिजाचे उत्पन्न मिळणार नाही. संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेचे कामे ठप्प राहणार. गौण खनिजाचा महसूल बुडणार असून कामबंद आंदोलनामुळे विविध योजनांविषयक ऑफलाईन येणार्‍या अर्जाच्या याद्या अद्ययावत होणार नसल्याचे संघटनेचे म्हणने आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील महसुली कर्मचार्‍यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाला सुरुवात केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments