Saturday, September 7, 2024
Google search engine
HomeUncategorizedवनहक्काचे अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एक मोठे आंदोलन उभारू : आमदार सहषराम...

वनहक्काचे अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एक मोठे आंदोलन उभारू : आमदार सहषराम कोरोटे

गोंदिया : २००६ मध्ये वनहक्क कायदा हा तैयार करण्यात आला. त्यावेळी कांग्रेस पक्षाची सरकार होती. हा कायदा कांग्रेस पक्षाची देण आहे. आतापर्यंत सर्व ठिकाणी व सर्व आदिवासी गावात पारंमपारीक पध्दतीने त्या भागात राहणारे वननिवासी आणि आदिवासी ह्या लोकांना सरसकट तेंदूपान संकलनाचे अधिकार होते. परंतू या वर्षापासून सरकार वनविभागाच्या माध्यमातून वनहक्क समिती व वनग्राम सभेला संकलनाचे टार्गेट देण्याचे काम केले आहे. हा टार्गेट आमच्या लोकांना नको आहे. आम्हाला आमचा अधिकार व हक्क पाहिजे आहे. हा अधिकार व हक्क मागून घेण्यासाठी आज देवरी येथे प्रथमच तालुकास्तरीय वनहक्क सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जर ह्यानंतर ही आम्हाला आमचे अधिकार व हक्क मिळाले नाही तर येत्या काळात आम्ही सर्व आदिवासी लोक मिळून या जिल्ह्यामध्ये एक मोठे जनआंदोलन उभारू असा ईशारा या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी दिला आहे.
आमदार कोरोटे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने मंगळवार (ता.११ जुलै ) रोजी देवरी येथे सिताराम मंगल कार्यालयात प्रथमच आयोजीत वनहक्क सम्मेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सम्मेलनात वनहक्क अधिकार आणि प्रशासकिय दडपशाही व समान नागरी कायदा आणि सांस्क्रुतिक अधिकार या विषयावर चर्चासत्राचे ही आयोजन करण्यात आले होते.
या सम्मेलनाचे उद्घाटन आमदार कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी जि.प.सदस्य संदिप भाटिया, उषाताई शहारे, महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुनंदाताई बहेकार, कांग्रेसचे शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोनू नेताम, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रंजित कासम, नगर सेवक शकील कुरैशी, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर राऊत, तालुका सचिव कैलास मरसकोल्हे, महिला सरपंच संघटनेचे अध्यक्ष गुणवंताताई कवास , वनहक्क समिती देवरी तालुका युनीटचे अध्यक्ष नारायण ताराम,चर्चा सत्राचे विषय मार्गदर्शक प्रा. मधु दिहारी व लोकेश ताराम, कांग्रेस पक्षाचे बळीराम कोटवार, सचिन मेळे, जैपाल प्रधान, छगन मुंगणकर यांच्यासह वनहक्क समिती व ग्रामसभा संलग्न देवरी प्रक्षेत्र, मुल्ला प्रक्षेत्र, पालांदूर/जमी. प्रक्षेत्र, चिचगड प्रक्षेत्राचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सरपंच संघटनेचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुक्यातील आदिवासी भागात राहणारे लोक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांनी आमदार कोरोटे म्हणाले की,वनहक्क कायद्या अंतर्गत वनवासी व आदिवासी लोकांना मिळालेले अधिकार व हक्काची अमलबजावनी जो पर्यंत प्रशासन करीत नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही. येत्या १७ जुलै पासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार असून जो पर्यंत या भागातील आदिवासी लोकांना वनहक्काचे अधिकार मिळत नाही.तो पर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचेही आमदार कोरोटे म्हणाले. दरम्यान वनहक्क समिती व ग्रामसभा देवरी तालुका युनीटच्या पदाधिका-यांच्या हस्ते आमदार कोरोटे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देवून सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक विलास भोगारे यांनी तर संचालन कमलेश नंदेश्वर यांनी केले आणि उपस्थितांचे आभार कैलास बन्सोड यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments