गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माणचे संकल्प म्हणून जिल्हयात स्वतंत्र विदर्भ राज्याचा वणवा पेटवण्यासाठी गोंदियात विदर्भवाद्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हा कोअर कमेटी सदस्य, जिल्हा समन्वयक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, वेगवेगळ्या पातळीवरील पदाधिकारी व नेते यांची १८ जुलैला स्थानिक शासकीय विश्रामगृह, रेलटोली गोंदिया येथे सभा पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
आयोजित सबेत ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नागपूर येथे आयोजित आंदोलनात उपस्थिति, ५ व ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मंडल यात्रेचे आगमन विषयी चर्चा, २८ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा जिल्ह्यात करावयाच्या ‘नागपूर करार होळी’ यांआदोलनाचे स्वरूप व पूर्व तयारी बाबत चर्चा, महाराष्ट्र विधी मंडळाच्या कालावधित नागपुरला घ्यावयाच्या ‘लॉग मार्च’ व मेळावा बाबत चर्चा करण्यात आली. व विदर्भातील समस्यासह जनसुरक्षा कायदा, शिक्षण बचाव मोहीम, शेतकरी समस्या व स्थानिक मागण्या या विषयी पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे या विषयांवर चर्चा करण्यातआली आणि आम संमतीने निर्णय घेण्यात आले.
सभेला जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे, जिल्हाध्यक्ष वसंत गवळी, कोर कमेटी सदस्य छैलबिहारी अग्रवाल, यशवंत रामटेके, वजीर बिसेन, सुंदरलाल लिल्हारे, रमेश बिसेन, जिल्हा उपाध्यक्ष भोजराजठाकरे, जिल्हा महासचिव सी. पी. बिसेन, जिल्हा सचिव भूपेंद्र पटले, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंचशीला पानतावणे अरुण बन्नाटे, कार्यकर्ते मनोहर भावे, हिमांशू भाजीपाले, सुरेंद्र नागभीरे, यशवंत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळाव्याचे गोंदियात आयोजन
RELATED ARTICLES