विद्युत खांबाला लटकला इसम, सुदैवाने जीव वाचला

0
102

गोंदियाः शहरातील विद्युत व्यवस्था किती भरोस्याची आहे, हे पुन्हा एकाच दिसून आले. स्थानिक न्यु लक्ष्मीनगर परिसरात बुधवारला(दि.२९) महावितरणच्या वतीने विद्युत तार सरळ करण्याचे व नवीन खांबावर तार घालण्याचे काम करण्यात येत होते.दरम्यान न्यु लक्ष्मीनगर परिसरातील संत तुकाराम महाराज चौकात एका विद्युत खांबावर विद्युत तारांना सावरण्यासाठी चढलेल्या इसमाला विद्युत धक्का लागला. सुदैवाने ही बाब त्याच्यासोबत असलेल्या काहींना लक्षात आल्याने लगेच त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु या प्रकाराने महावितरणच्या कारभारावर चांगलेच तासेरे ओढले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here