Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedविनयभंग करणाऱ्या आरोपीला ९ वर्षाचा सश्रम कारावास

विनयभंग करणाऱ्या आरोपीला ९ वर्षाचा सश्रम कारावास

गोंदिया,दि.०३-येथील विशेष सत्र न्यायालयाने बाल लैगिक प्रकरणातील आरोपीला बालकांचे लैंगिक अत्याचारप्रकरणी ०९ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व ४,०००/- रूपये दंडाची शिक्षा आज 3 मे रोजी ठोठावली.सदर प्रकरणातील आरोपी निखील ठाकरे(वय 32,गोंदिया)विरुध्द संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८ व भारतीय दंड विधानाचे कलम ३५४,३२३,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण ०७/१०/२०१८ रोजी सायं ०३.०० वाजताच्या दरम्यान घडले होते.यातील पिडिता १६ वर्षे ही तिचे नातेवाईकाच्या घरी एकटी असतांनी आरोपीने सूना मोका पाहून
तिच्यावर लैंगिक हमला करून तिचा चाकुचा धाक दाखवून व जिवाने मारण्याची धमकी देवून विनयभंग केला होता.ही सर्व गोष्ट पिडितेने तिच्या आई व मावशिला सांगितल्यावरून पिडितीने पोलीस स्टेशन गोंदिया शहरनयेथे आरोपीविरूध्द तक्रार नोंदवली होती.त्या आधारावर आरोपीविरूध्द कलम ३५४,३२३,५०६ भादवि व कलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदवून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सांदिया सोमनकर यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकुण सहा साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली.
एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादा नंतर जिल्हा न्यायाधिश 2 व विशेष सत्र न्यायाधिश एन.बी.लवटे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला कलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे ४ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये १००० /- दंड व व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.तसेच कलम ३५४ भा.द.वि. प्रमाणे ३ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये १००० /- दंड व व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा,तसेच कलम ३२३ भा.द.वि. प्रमाणे १ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये १००० /- दंड व व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा,
तसेच कलम ५०६ भा.द.वि. प्रमाणे १ वर्षाचा सश्रम कारावास व रूपये १००० /- दंड व व दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा, असा एकुण ०९ वर्षाचा सश्रम कारावास व एकुण ४००० /- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेशित करण्यात आले. तसेच शासनाला मनोधर्य योजनेतून पिडितेला सानुग्रह अनुदान देण्यासाठी आदेशित केले.सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई श्रीमती टोमेश्वरी पटले यांनी उत्कृष्ट काम पाहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments