Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedविना परवाना रासायनिक खात घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांवर कृषी विभागाची कारवाई, तीन...

विना परवाना रासायनिक खात घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांवर कृषी विभागाची कारवाई, तीन मालवाहक जप्त

गोंदिया : विना परवाना परप्रांतीय शेतकऱ्यांना रासायनिक खत विक्री केल्यानंतर रासायनिक खते घेऊन जातानी कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत तीन मालवाहक जप्त करण्यात आले असून गाडी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आमगाव शहराला लागूनच छत्तीसगड व मध्य प्रदेशची सीमा आहे. व या परिसरातील नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. खरीप हंगामाला सुरूवात झाली असून बहुसंख्य शिवारात धान पिकांचा पेरा सर्वाधिक दिसून येत आहे. पिकांना उभारी घेण्यासाठी विविध रायायनिक घटकांचा समावेश असलेल्या खतांची गरज असल्यामुळे शेतकरी कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करून आहेत परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे शहरात आढळून आले आहेत. दिनांक १२ जुलै शनिवारला सायंकाळी पाच वाजे दरम्यान परप्रांतीय शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असताना कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून तीन वाहन जप्ती केले आहेत. ४५ बोरी रासायनिक खत एकूण किंमत ४५००० हजार रुपये किमतीची रासायनिक खते जप्त करण्यात आली आहेत. वाहन क्रं एम एच ३५ ए जे ४३६२, एम एच ३५ ए जे ३५२९ एम एच ३१ डी एस २५९७ वाहन चालक शैलेंद्र दमाहे रा.घंसा , शुभम येडे राहणार पाथरगाव, विनोद कोघुटे राहणार बिंजली या गाडी चालकांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ (४) (ब ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. परप्रांतीय शेतकरी आमगाव तालुका जवळ असल्यामुळे आमगाव शहरातील रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून विनापरवाना खत खरेदी करून नेत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असे परंतु कृषी विभागाची कारवाई मात्र शून्य असायची. विनापरवाना खत घेऊन जातानीमागील काही वर्षात पहिल्यांदाच कृषी विभागांनी केलेली कारवाई असून खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील काही दुकानदार विनापरवाना परप्रांतीय शेतकऱ्यांना खते विकतात आज केलेल्या कारवाईत खरेदी केलेल्या दुकानदारांची नावे शेतकऱ्यांनी सांगितलेली आहे. रासायनिक खत विक्री केल्याची कच्ची पावती शेतकऱ्यांकडे दिसून आली आहे. आमगाव शहराच्या टोकावर व अगदी सीमेवर काही रासायनिक खतांची दुकान असून काही दुकानदार परप्रांतीयांना रासायनिक खते विक्री करतात परंतु पुराव्या अभावी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली दिसत नाही.

बॉक्स
काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावे समोर आली असून तपास सुरू आहे तपासानंतर पुरावा आढळल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.
संतोष सातदिवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी विभाग गोंदिया.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments