गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अध्यक्ष/उपाध्यक्ष संघटने चे पदाधिकारी डोमाजी बोपचे (अध्यक्ष), टेकचंद शरणागत (उपाध्यक्ष), महाप्रकास बिजेवार (कोषाध्यक्ष), मार्कंड ब्राह्मणकर (कालीमाठी), पुनेश बोपचे (बोटे), मनोज वालदे (तेढा), राजकुमार पारधी (गणखैरा), लोकराम बोपचे (मोहगाव/तिल्ली), डॉ. योगेश हरणखेडे (कटंगी), लिलेश्वर रहांगडाले (तिल्ली), खेमराज डहाके (मुंडीपार), ध्रुवराज पटले (हिरापूर), निलाराम कटरे (तिमेजरी), घनश्याम शिवणकर (तेढा), भागदास मेश्राम (बाघोली), केदारनाथ लांजेवार (कुऱ्हाडी), पुरनलाल शरनागत (खाडीपार), योगराज बोपचे (सोनी), संपत राहांगडाले (घोटी), तुकाराम दानी (कलपाथरी) असे एकुण ३५ संस्थाचे अध्यक्ष)/उपाध्यक्षांनी रेखलाल टेंभरे (डायरेक्टर जीडीसीसी बॅंक गोंदिया व भाजप नेते) यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या अनेक समस्यांबाबत निवेदन दिले. निवेदनात संस्थेच्या नवीन सभासदांना व जुन्या खंडित सभासदांना पीक कर्ज मिळाला पाहिजे, संस्थेच्या शेअर्सची रक्कम बँकेने आपल्या वसुलीत जमा करू नये, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी त्वरीत मिळावी व जुन्या कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमाफी मिळावी अशा प्रकारचे निवेदन दिले. जीडीसीसी बॅंकेचे डायरेक्टर रेखलाल टेंभरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या समस्यांवर शासन व बॅंकेकडे पाठपुरावा करणार आहेत.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या समस्या मार्गी लावा : रेखलाल टेंभरे
RELATED ARTICLES