गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्ह्यातील वगळलेल्या ४ तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्त यादीत समावेश करण्यासह लिपिकांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार परिणय फुके यांना १९ जुर्ले रोजी देण्यात आले. यावेळी आमदार फुके यांनी वेतनश्रेणीत असलेल्या त्रुटीबद्दल सकारात्मक विचार करण्याचेे आश्वासन कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले. निवेदनात गोंदिया जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे माहे जुलै 25 पासून 4 तालुक्यातील कर्मचार्यांचे वेतन कमी होत असल्याचे निर्देशनास आणून दिले. वेतन त्रुटी समितीच्या चुकीच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर अन्याय होत असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे वेतन अन्य मंत्रालयीन कर्मचाऱ्यापेक्षा कमी असल्याचे सुद्धा निदर्शनास आणून दिले. यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सौरभ अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस संतोष तोमर, नंदलाल कावळे, किशोर येले, यश गडपल्लीवर उपस्थित होते.
वेतन फरकातील त्रुटीसंंदर्भात कर्मचारी महासंघाचे आ. फुकेंना निवेदन
RELATED ARTICLES






