Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहरातील मुख्य चौकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावा, सिंधी जनरल पंचायतची मागणी

शहरातील मुख्य चौकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावा, सिंधी जनरल पंचायतची मागणी

वाहतूक समस्यांबाबत सकारात्मक चर्चा
गोंदिया : शहरातील वाढती गुन्हेगारी,तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने घडत असलेले अपघात बघता शहरातील मुख्य चौकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, यासह अन्य विषयांना घेऊन सिंधी जनरल पंचायतच्या प्रतिनिधी मंडळाने वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नागेश भास्कर यांची भेट घेऊन चर्चा केली.
या चर्चेला सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष दरियानोमल आसवानी, महेश आहुजा, अशोक जयसिंघानी, विनोद चांदवानी आदी उपस्थित होते. चर्चेत शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घटना घडत आहेत. घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे अपघात घडत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील प्रत्येकच भागात मोठ्या प्रमाणात गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या घरासमोर आपल्या मर्जीने गतिरोधक तयार करून घेतले असून गतिरोधकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. शिवाय, मोकाट जनावरांचे बस्तान रस्त्यांवरच राहत असून यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघातांच्या घटना घडत आहेत. अशात, शहरातील मुख्य चौकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. रस्त्यांवर असलेल्या ब्रेकरमुळे होणारी गैरसोय टाळण्यात यावी व शहरातील भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांची समस्या लक्षात घेत या समस्येवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी प्रतिनिधी मंडळाने केली. यावर पोलिस निरीक्षक भास्कर यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व मुद्दे बारकाईने ऐकून घेतले व लवकरच टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून समस्यांवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. शहरात सुरक्षित, शिस्तबद्ध व आधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments