डासांमुळे नागरिक त्रस्त : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया : सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. या डासांमुळे शहरवासी त्रस्त झाले असून नगर परिषद प्रशासनाविरूद्ध रोष निर्माण झाले आहे. मात्र, संपूर्ण शहरात डासनाशक औषध फवारणी करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवार, 28 फेब्रुवारी रोजी मुख्याध्याधिकारी करण चव्हाण यांना दिले.
सध्या थंडी कमी झाल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानात वृद्धी होत आहे. मात्र, थंडी कमी झाल्याने डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डासांच्या प्रकोपामुळे शहरवासी त्रस्त झाले आहे. या डासांमुळे लहान चिमुकल्यांसह नागरिकांना आजार होण्याची शक्यता आहे. नगर परिषद प्रशासनाद्वारे शहरात डासांच्या रोकथामाकरिता उपाययोजना करण्यात येत नाही. तसेच डासांवर नियंत्रण आणण्याकरिता शहरात औषध फवारणी व फॉगींग मशीनाच्या माध्यमातून फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष नगर परिषदेने संपूर्ण शहरात फॉगींग मशीनद्वारे नाल्यांत व रिक्त जागेत फवारणी करावी, अशी मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी करण चव्हाण यांना दिले. निवेदन देतेवेळी, माजी नगरसेवक लोकेश यादव, सोनू राय, मुकेश मिश्रा, हर्षद चुटे, चंद्रकुमार चुटे, शाहरूख पठाण, पुरण पाथोडे आदी नागरिक उपस्थित होते.
शहरात डासनाशक औषध फवारणी करा
RELATED ARTICLES