Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाळामध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेचे निवेदन

शाळामध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेचे निवेदन

गोंदिया : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून जिल्हा परिषद,नगर परिषद शाळांसह खासगी शाळामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व नगरपरिषद प्रशासनाला गोंदिया शहर मनसेच्यावतीने देण्यात आले.तसेच शहरातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून संवाद साधून निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शासनाकडून प्राथमिक शाळेत त्रिभाषा सूत्र व त्यामध्ये हिंदीसक्तीकरण विरोधात निवेदन देण्यात आले. पूर्वी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात दोनच भाषा अनिवार्य होत्या(मराठी व इंग्रजी) पण त्यामध्ये शासनाकडून तिसरी भाषा हिंदी समाविष्ट करुन लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मायबोली मराठीची अवहेलना सरकारकडून होत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केले.चर्चेदरम्यान महाराष्ट्र शासनाने हा निर्णय कधी जर मागे नाही घेतला तर शहरात व जिल्ह्यात मोठा आंदोलन करण्याचा इशारा दिला.याप्रसंगी मनसे गोंदिया शहर अध्यक्ष सुरेश नानू चौधरी, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर उपाध्यक्ष डिलेश उके, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, छोटा गोंदिया शाखाप्रमुख कार्तिक राऊत, शहर प्रसिद्धीप्रमुख कृष्णा ढोंगे तसेच सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments