Monday, June 30, 2025
Google search engine
HomeUncategorizedशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा : खा.प्रफुल पटेल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा : खा.प्रफुल पटेल

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खा. प्रफुल पटेल यांनी आरोग्य विभागाच्या व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मागील आठवड्यात श्री पटेल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ व आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त यांच्याशी इमारतीच्या प्रगतीविषयी सविस्तर चर्चा केली होती.

कुडवा येथे 690 कोटी रुपये निधीतून अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन इमारतीत ६५० खाटांची रुग्णसेवा व 150 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण या महाविद्यालयात होणार आहे.खासदार प्रफुल पटेल हे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम वेळेत व दर्जेदार बांधकाम होईल असा विश्वास यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments