संगणक चालक महिलेला मानसिक त्रास, आदेशाकडे पाथरी ग्रा.पं.चे दुर्लक्ष

0
232

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत पाथरी येथील महिला संगणक चालक महिला कर्मचारीला ग्रामपंचायत सदस्यांच्या द्वेषापोटी मासिक सभेत ठराव घेत परिचालक पदावरुन कमी केल्याची तक्रार बालिका सुखलाल मच्छिरके यांनी केली आहे.महिला संगणक परिचालक म्हणून 2011 पासून पाथरी ग्रामपंचायत येथे कार्यरत असल्याचे तक्रारीत उल्लेख करीत वरिष्ठांकडे न्याय मागितले होते.वरिष्ठांनी देखील हा प्रकार योग्य नसल्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशांचेही पालन न करता वर्षभरापासून संगणक परिचालक महिलेला त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे मच्छिरके यांचे म्हणने आहे.
पाथरी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत संगणक परिचालकाला मासिक सभा किंवा ग्रामसभाच्या माध्यामातून थेट कामावरून कमी करता येत नाही, तसेच द्वितीय सुनावणीचा अंतिम निर्णय येईपर्यंत केंद्रचालकाला, संगणक परिचालक यांना कार्यालय ग्राम पंचायत पाथरी येथील कामावरून कमी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट नोंद असतांनाही यापूर्वी कोणतेही कारणे दाखवा नोटीस न बजावता 9 ऑक्टोबर 2024 च्या मासिक सभेत खुलासा सादर करण्याचे पत्र न देता मासिक सभेनंतर चौथ्या दिवशी देण्यात आले. सभेत झालेल्या निर्णयाची प्रत संगणक परिचालकाला देणे अपेक्षित असताना कोणतीही प्रत न देता बनावट पत्र तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. सदस्यांनी स्वतःचेच बयान देत कामावरून कमी करण्याचा ठराव घेण्यात आला. आपल्यावर कोणते आरोप आहेत, याची माहिती मागून देखील देण्यात आली नाही. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत केंद्रचालकांचा शिस्तभंगाबाबत मार्गदर्शन सूचना अन्वये प्रथम अपिलाचा अनुषंगाने गटविकास अधिकारी यांच्या चौकशीअंती संगणक परिचालक निर्दोष आढळले. त्यामुळे संगणक परिचालक यांना कामावरून कमी करण्याबाबतची केलेली कार्यवाही फेटाळण्यात आली असे असतानाही संगणक परिचालक महिलेला ग्राम पंचायतीत बसू देण्यात येत नाही.यावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील आदेश देवूनही सरपंच आणि ग्राम पंचायत अधिकारी हेकेखोरपणे वागत असल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here