Wednesday, January 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधानाच्या मूल्यांवर चालत सर्वसामान्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध : आमदार राजकुमार बडोले

संविधानाच्या मूल्यांवर चालत सर्वसामान्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध : आमदार राजकुमार बडोले

गोंदिया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सडक/ अर्जुनी यांच्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात इंजि. राजकुमार बडोले, आमदार तथा माजी मंत्री सामाजिक व न्याय विभाग यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, “भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य व न्याय दिला आहे. या संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. सामाजिक न्याय, विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.” या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, नगरपंचायतचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपनगराध्यक्ष सौ. वंदनाताई डोंगरवार, महिला तालुकाध्यक्ष सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे यांच्यासह नगरसेवक देवचंद तरोने, महेंद्र वंजारी, गोपीभाऊ खेडकर, नगरसेविका सौ. दीक्षाताई भगत, शाहिस्ता शेख, डॉ. रीताताई लांजेवार, सायमा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पत्रकार डॉ. भगत सर, राजेश मुनेश्वर, सुशील लाडे, बिरला गणवीर, सरपंच वडेगाव खोटोलेजी, प्रल्हाद कोरे, उमेश गिरीपुंजे, डॉ. अविनाश यावलकर, अफरोश शेख, तसेच महिला पदाधिकारी प्रमिलाताई बडवाईक, पुष्पाताई गुप्ता, आनंद निखारे, रेखाताई लांजेवार, विमलताई गिरीपुंजे, रेखाताई मुनेश्वर, उषाताई होळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने सडक अर्जुनी येथील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments