Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedसरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत व शासकीय खरेदी केंद्र सुरु करा :...

सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत व शासकीय खरेदी केंद्र सुरु करा : माजी आमदार राजेंद्र जैन

गोंदिया : निसर्गाच्या प्रकोपाने गोंदिया जिल्हयातील शेतकरी हवालदिल झाला आहे अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेताना दिसतो आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे हजारो शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील धान, मक्का, भाजीपाला, फळबाग अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, सातबाराच्या नोंदी घेऊन त्वरित शासकीय आधारभूत खरेदी केंद्र सुरु करावेत. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एरिया 51, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे यांचे जनसंपर्क कार्यालय कोहमारा येथे शेतकरी, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हा अध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

श्री जैन पुढे म्हणाले की, जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात ४० हजार हेक्टर वर शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली आहे तसेच मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी तालुक्यात १० हजार हेक्टर वर मका पिकाची लागवड केली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे झालेल्या धान,मका, फळबागा, भाजीपाला तत्सम पिकांच्या व मातीची घरे, गुरांची गोठ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. उन्हाळी धान व मका खरेदी करण्यासाठी सात/बारा आनलाईन करण्याची अंतिम तारीख १५ मे असून हजारो शेतकऱ्यांचे सात/बारा आनलाईन झालेले नाही त्यामुळे आनलाईन करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात यावी व लवकरात लवकर शासकीय आधारभूत खरेदी केंद्र सुरू करावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, यशवंत गणवीर, सुधाताई रहांगडाले, मंजुषा बारसागडे, किरणताई कांबळे, पारबता चांदेवार, तेजराम मडावी, वंदना डोंगरवार, डॉ आर बी वाढई, शिवाजी गहाणे, आनंद कुमार अग्रवाल, रतिराम कावळे, देवानंद कोरे, चित्रलेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, सुरेखा भोवते, अनिशा पठाण, छाया टेकाम, वनिता कोरे, लता गहाणे, शाहीथा शेख, दीक्षाताई भगत, हर्षाताई राऊत, निर्मलाबाई ईश्वार, सुशीला हलमारे, अस्मिता मेंढे, छायाताई कुलभजे, भैय्यालाल पुसतोडे, दीनदयाळ डोंगरवार, ईश्वर कोरे, तेजराम चुटे, चंदूभाऊ बहेकार, होमेश्वर यादोराव , दामोदर बघेले, धनराज कवास, देवाजी बनकर, ईश्वर जगदाळे, सुशील पोद्दार, रतिराम राणे, नाशिक शहारे, रोशन नंदागवली, डॉ चंद्रशेखर बांबोले, अशोक इंदूरकर, मुकेश नरोटे, मुन्नाभाई नंदागवली, संजय रामटेके, आर के मेश्राम, प्रदीप लोणारे, चरणभाऊ कराडे, योगेश टेम्भूर्णे, रेखाताई पालीवाल, जयश्री मस्के, संग्रामे सर, सदानंद टेकाम, रामलाल कुंभरे, देवदास कोरोटी, अशोक इंदूरकर, आरके जांभुळकर, ज्ञानीराम कापगाते, विनाराम कापगते, सुरेश झोडे, आर के भगत, दुलीचंद तागडे, मंगेश नागपुरे, योगराज हलमारे, रामचंद्र नन्हें, देवेंद्र गहाणे, युवराज लांजेवार, भोलानाथ कापगते, ओमप्रकाश लंजे, ललित तागडे, संजय ईश्वर, अमोल ठलाल, अशोक लांजेवार, ओमेश्वर कापगते, रणजित भोयर, शैलेश भोयर, गजानन कोवे, आकाश ठवरे, संजय ठवरे, अनिल मानकर, महेश उईके, कैलाश बोरकर, दीपक नागपुरे, शयामराव नागपुरे, केवलराम ठाकरे, श्यामराव वासनिक, बिर्ला गणवीर, दिनेश कोरे, उमराव मांढरे, बाळकृष्ण काशीवार, रमेश बडोले, राकेश जैन, मधुकर गावराने, केदारनाथ गौतम, धर्मेंद्र पटले, आदित्य रुखमोडे, सूर्यभान तोरणकर, मुनीश्वर कापगते, शिवकुमार कापगते, राजरतन डोंगरवार, सोविंदा नागपुरे, विनायक कोरे, संजीव सहारे, मुन्ना देशपांडे, कृष्णा ठलाल, सुभाष कापगते, टीकाराम कुलभजे, राहुल यावलकर, भागवत झिंगरे, धनराज भजने, ओमराज दखने, शेखर चांदेवार, केशव तरोणे, धोंडूभाऊ शेंडे, श्रीराम झिंगरे, रामेश्वर धोटे, द.रा. चंद्रिकापुरे सहीत मोठया संख्येने शेतकरी, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचीत कृषी उत्पन्न बाजार समिती सडक/ अर्जुनी मध्ये निवडून आलेले संचालकांचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन निवडून आलेले अविनाश काशीवार, डी यू रहांगडाले, देवेंद्र गहाणे, आनंद अग्रवाल, खेमराज देशमुख, रातिराम कांबळे, रामकृष्ण नान्हे, राजकुमार हेडाऊ, दामोदर बोपचे, अस्मिता मेंढे व खरेदी विक्री मध्ये परबता चांदेवार, भैयालाल पुस्तोडे, भोलानाथ कापगते, मधु गावराने, केशव तरोने यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments