गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सीलकरून स्ट्रॉगरूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय येथे नेण्यात आल्या. परंतु तहसील कार्यालयामध्ये सदर १७ प्रभागातील ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला. कोणतीही पूर्व कल्पना उमेदवाराला आणि त्यांचा कोणत्याही प्रतिनिधीला देण्यात आली नाही. अशा प्रकारे ईव्हीएम मशीनचे सील तोडून त्यांच्या छेडखानी तर करण्यात आली नाही ना? असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बृजभुषन बैस, सालेकसा तालुका काँग्रेस अध्यक्ष दोनोडे, काँग्रेसचे उमेदवार विजय फुंडे यांच्यासह उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सालेकसा नगरपंचायतीमध्ये सध्या एकच गोंधळ निर्माण झालाय. त्यामुळे सालेकसा तहसील कार्यालय परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी सांगितले की स्वीच ऑन ऑफ आहे की नाही. हे आम्ही कंट्रोल युनिट पाहिले आणि याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. अशी त्यांनी प्रतिक्रिया संबंधित व्यक्तींना दिली आहे.






