हद्दपार सराई गुन्हेगाराला केली अटक 

0
191

गोरेगाव पोलिसांची कारवाई

गोंदिया : गोंदिया जिल्हयातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार अक्षय गोविंद बावनकर (वय 32) याने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा यांच्या हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्या विरोधात गोरेगाव पोलिसांनी कलम 142 (अ) मु. पो. का. 1951 अन्वये गुन्हा नोंद केला.

गोरेगाव तालुक्यातील नोनीटोला येथील अक्षय गोविंद बावनकर यांना उपविभागीय अधिकारी तिरोडा यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. या आदेशाची तामील झाली किंवा नाही, याची तपाणी पोलिसांकडून सुरू होती. गोरेगाव पोलिस ठाण्याचे पथक 12 जानेवारी रोजी वॉरंट मधील आरोपी शोध व पेट्रोलिंग करत असताना तसेच नोनीटोला येथील अक्षय गोंविद बावनकर, याचे पकड वारंट निघाले असल्याने गोरेगाव पोलिस पथकाने अक्षयच्या घरी गृहभेटीकरिता गेले. दरम्यान तो घरी हजर मिळून आला. त्याला उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून इथे परत का आले म्हणून विचारणा केली असता, त्याने उपविभागीय अधिकारी यांचे आदेशांचे उल्लंघन केल्याबाबत काहीही ठोस कारण सांगितले नाही. त्यामुळे आरोपी अक्षय गोंविद बावनकर, याच्या विरुध्द गोरेगाव पोलिसानी गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात सहा्य्यक फौजदार खंडाते, पोलिस नायक कोल्हारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here