टिप्परने दिली दुचाकीला धडक, एक महिला ठार तर एक जखमी

0
384

गोंदिया : गोंदिया -तिरोडा मार्गावरील चुरडी फाटा जवळील ताज एजेन्सी जवळ टिप्परच्या धडकेत दूचाकीस्वार जखमी तर एक महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या दरम्यान घडली आहे.

अदानी पॉवर प्लांट मधून राख वाहून नेणाऱ्या टिप्पर क्रमांक MH 35 AJ -3909 ने दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी क्रमांक MH 49 AN 1956 वरील दुचाकीस्वार जखमी झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली महिला प्रमिला प्रमोद थुलकर वय ४५ वर्ष राहणार ठाणेगावचा जागीच मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here