Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorized300 फुट मोबाईल टॉवर वर चढून प्रेम प्रकरणात गांधीगिरी

300 फुट मोबाईल टॉवर वर चढून प्रेम प्रकरणात गांधीगिरी

गोंदिया : देवरी तालुक्यातील चिचगड पोलिसानी प्रेमात आंधळे होऊन आत्महत्या सारखे टोकाचे पाउल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले आहे. शोले स्टाईलने 300 फुट मोबाईल टॉवर वर चढून प्रेम प्रकरणात गांधीगिरी करून जीव देण्याचा प्रयत्न करणार्‍या दिपक कुमार रेन सिंह सलामे वय 24 वर्षे रा. खामखुरा या मुलाचे छत्तीसगड राज्यातील तरुणीने लग्नासाठी नकार दिल्याने नैराश्यातून जीव देण्याच्या तयारीने मुलाने गावातील मोबाईल टॉवर वर चढुन जिव देण्याचा प्रयत्न केला.

याची माहीत स्थानिकांनी पलिस्टेसन चिचगड यांना देताच ठाणेदार शरद पाटील व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचत त्यांनी त्या तरुणाशी मोबाइल द्वारे संपर्क बनवून त्याच्या मन धरणीचे सलग चार तास प्रयत्न केले. पण तो तरुण काही एक ऐकत नव्हता. शेवटी हे प्रकरण ठाणेदार शरद पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तरुणाचे प्राण वाचवायचे ठरवून त्याला सतत मोबाइल वर बोलण्यात व्यस्त ठेवले व त्याला स्वताच्या जिवाचे बरे वाईट करायचे नाही असे सांगून त्यांनी त्याला विश्वासात घेऊन ईतर आवश्यक असलेल्या वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध केल्या व सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मदतीने त्या तरुणाला अवघ्या 4 तासात सुखरूप खाली उतरविले.

पोलिसांनी या प्रकरणी अतिशय काळजीपूर्वक ही घटना हाताळणी याबद्दल समाजामध्ये चिचगड पोलिसांचे कौतुक होत आहे, यावेळी ठाणेदार शरद पाटील व त्यांची पूर्ण टीम ज्यात पोलिस हवालदार देसाई , कोरेटी , न्यायमूर्ती , तांदळे व कानशकर यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments