गोंदिया : 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 85 वर्षावरील मतदार व 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांकरीता 9 नोव्हेंबर रोजी गृह मतदान पार पडले. स्टेशन रोड तिरोडा येथील रहिवासी असलेले 95 वर्षीय नत्थू सीताराम गाढवे यांनी आपला गृह मतदानाचा हक्क बजावला. गृह मतदानाच्या वेळी निवडणूक निरीक्षक सामान्य सुनिल कुमार तसेच नोडल अधिकारी पंकज जिभकाटे, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी निलेश कानवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. 85 वर्षावरील मतदार व 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांकरीता गृह मतदानासाठी तिरोडा विधानसभा मतदार संघातील मतदारांकरीता पथक क्रमांक 4 मध्ये नियंत्रण अधिकारी जी.आर.पटले, मतदान केंद्राध्यक्ष प्रेमलाल गौतम, मतदान अधिकारी प्रकाश पारधी, सुक्ष्म निरीक्षक मंगेश बांगरे, ए.एन.उगावकर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार मतदान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 85 वर्षावरील मतदार व 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांकरीता गृह मतदान यशस्वीरित्या पार पडले.
95 वर्षीय नत्थू गाढवे यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क
RELATED ARTICLES