Monday, April 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedआटा चक्कीच्या पट्ट्याला ओढणी अडकून चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यु 

आटा चक्कीच्या पट्ट्याला ओढणी अडकून चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यु 

गोंदिया: गळ्यातील ओढणी आटा चक्की च्या पट्ट्याला अडकून झालेल्या भिषण अपघातात धडापासून डोकं वेगळे होऊन येथील एका छेचाळीस वर्षीय महिलेचा करूण अंत झाला.या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर दुर्देवी घटना आज दिनांक २८ जून रोज शुक्रवारला दुपारी अंदाजे ४.३० वाजेच्या दरम्यान येथील आझाद चौकातील हर्षल उजवणे यांच्या आटा चक्कीत घडली.नीतू हर्षल उजवणे(वय ४६ वर्षे) राहणार नवेगावबांध असे मृतक महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील आझाद चौकात हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे. आज दिनांक २८ जून रोज शुक्रवारला दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या पत्नी नीतू ह्या नेहमीप्रमाणे आटा चक्की वर दळण दळत असताना, त्यांच्या गळ्यातील ओढणी दळण टाकताना किंवा अन्यकारणाने आटा चक्की च्या पट्ट्याला अडकली असावी, त्यामुळे त्यांचे डोके आटा चक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या झालेल्या भीषण अपघाताने गावात एकच खळबळ उडाली असून, उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.नीतू यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे आटा चक्की च्या समोर रस्त्यावर गावातील महिला पोलिसांनी एकच गर्दी केली होती. इकडे घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले आपल्या सहका ऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे पाठविले आहे. नवेगावबांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून,पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments