गोंदिया: देवरी – चिचगड मार्गालगत असणाऱ्या पुरूषोत्तम चदंनमलागर यांच्या हॉटेलला रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये संपूर्ण हॉटेल आगीत जळून खाक झाले. सोबतच लागुन असलेले साईराम ऑटो स्पेरपार्ट चे दुकानही त्या आगीत जळुन खाक झाले. दुकाना लागलेली आग आटोक्यात येई पर्यंत हॉटेल व दुकानातील सगळे साहीत्य जळुन खाक झाले होते.
आग लागल्यानंतर परिसरातील नागरीकानीं आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलान हॉटेलच्या पुढील व मागील बाजूकडून शर्थीचे प्रयत्न करून आग कसीमसी आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकानीं पाण्याची व आवश्यकती मदत केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हॉटेल व स्पेरपार्टचे दुकान पूर्णपणे जळाले. आग कशामुळे लागली याची अजुनही माहीती मिळाली नाही.



