महिला सरपंचाने हाणली युवकाच्या कानशिलात

0
351

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असुन या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले, कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत.त्यातच तालुक्यातील नवेगाव/बांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणल्याची घटना ४ जुर्ले रोजी घडली. मारहाण करणार्या नवेगाव/बांध ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचे नाव सौ. हिराबाई नीलमचंद पंधरे रा.खोली नवेगाव/बांध असे आहे. आशिष सुभाष लंजे वय 20 हा युवक दाखला मागण्यासाठी गेला असता पैशाचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणली. सदर युवक आशीष लंजे हा नवेगाव/बांध येथील रहिवाशी असुन ग्रामपंचायत नवेगाव/बांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्या वतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डन वरती काम पाहत होता.येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करीत होता काही दिवसाआधी त्याला कामावरून काढण्यात आले होते. सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे यांनी पैशाचा हिशेब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलीस स्टेशनला कबूल केले. सदर युवकाने सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव/बांध येथे तक्रार नोंदवली असुन (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here