Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेवलगाव येथे रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

देवलगाव येथे रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

गोंदिया : गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावरील देवलगाव-बाराभाटी पोल क्र.1070/02 ते 1070/03 रेल्वे पटरी मध्यनंतरी 2 दक्षिण दरम्यान रेल्वेच्या धडकेत एका इसमाचा मृत्यु झाल्याची घटना दि.20 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली असुन नारायण सुदाम काळसर्पे वय 43 वर्ष रा.नवेगाव/बांध असे मृतक इसमाचे नाव आहे.तर मृतक नारायण हा नवेगाव/बांध येथील रहिवाशी असलेले मार्कंड नेवारे यांच्या शेतीच्या कामासाठी मजुरीवर गेला होता. शेत मालक नेवारे यांची शेती देऊळगाव येथे रेल्वे लाईन जवळ असुन नारायण लघुशंकेसाठी रेल्वे लाईन ओलांडुन गेला.नारायण परत शेताकडे येत असतांना गोंदिया कडुन बल्लारशा कडे जाणाऱ्या रेल्वेनी धडक दिली. यात नारायणचा जागीच मृत्यु झाला. याची माहिती रेल्वे व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नवेगाव/बांध ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.सदर घटनेची मर्ग नोंद करण्यात आली असुन मर्ग क्रमांक 15/2024 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 दाखल केला आहे. ठाणेदार यांच्या आदेशाने सदर घटनेचा तपास नवेगाव/बांध पोलीसांनी चौकशीत घेतला आहे.
मृत नारायणच्या पश्चात पत्नी,1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे. मृतकाच्या वारसांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments