Friday, October 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedपाण्यात तिन तास उभे राहुन 25 गावातील घरात पोहचविला उजेड

पाण्यात तिन तास उभे राहुन 25 गावातील घरात पोहचविला उजेड

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या सप्ताहापासुन मुसळधार पाऊस पडत आहे.सर्वत्र नदीनाल्लांना पुर आला आहे.तालुक्यातील बरेचसे मार्ग बंद आहेत.अशातच आदिवासी नक्षलप्रभावीत अतिदुर्गम भाग असलेल्या केशोरी परिसरातील राजोली,भरनोली कडील 25 गावाचा विज पुरवठा खंडीत झाला.आपल्या जिवाची पर्वा न करता विज विभागाच्या कर्मचा-यांनी उपविभागीय अभियंता अमीत शहारे ,शाखा अभियंता प्रदीप राऊत यांचे मार्गदर्शनाखाली मुसळधार पावसात, पुलावरच्या तिन ते चार फुट पाण्यातून दोरखंडाच्या सहाय्याने मार्गक्रमण करीत तिन तास कंबरभर पाण्यात उभे राहुन 25 गावातील घरात उजेड आणुन दिला.विज कर्मचा-यांच्या या धाडसाचे नक्कीच कौतुक करावे तेवढे कमी आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यात मागील सप्ताहापासुन मुसळधार पाऊस पडत आहे.सर्वत्र पुरपरीस्थीती निर्माण झाली आहे.काही भागात विद्युतची समस्या सुध्दा निर्माण झाली आहे.अनेकदा विज बंद होण्यामुळे विज विभागावर जनता ताशेरे ओढत असते.परंतुसध्या अतिवृष्टीत पूरग्रस्त परिस्थीतीत विज विभागाच्या कर्मचा-यांनी जिवाची पर्वा न करता अनेक गावांचा विज पुरवठा सुरु केला.याबाबत अधिक माहीती घेतली असता आदिवासीबहुल नक्षलप्रभावीत केशोरी परिसरातील राजोली,भरनोली या अतिदुर्गम परीसरातील 20 ते 25 गावातील विज पुरवठा सतत चार दिवस खंडीत झाला होता. अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थीतीमुळे विज पुरवठा दुरुस्त करण्यास प्रचंड अडचणी येत होत्या अशाही विपरीत परीस्थीतीत मुसळधार पाऊस व पुरांचा सामना करीत विज विभागाच्या कर्मचा-यांनी उपविभागीय अभियंता अमीत शहारे,केशोरीचे शाखा अभियंता प्रदिप राऊत यांचे उपस्थितीत दिलीप शहारे,अजय वट्टी,विनोद मडावी,आशीष डोंगरवार,गुणवंत नेवारे, जुल्पीकार सैय्यद, देवा गोबाळे या चमुंनी प्रयत्नाची पराकाष्ठा करुन विज पुरवठा सुरळीत केला.सोबतच धाबेपवनी या अतिदुर्गम परीसरातील झासीनगर परीसरात विद्युत तारांवर झाड पडल्याने जंगल परीसरातील पाच खांब पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला होता.त्याहीठिकाणी भरपावसात विज खांब उभे करुन विज पुरवठा सुरु करण्यात आला.विज कर्मचा-यांच्या कार्यतप्तरतेमुळे अनेक गावातील लोकांनी त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments