घरफोडी करणारे दोघे चोरटे जेरबंद, रामनगर पोलीस पथकाची कामगिरी

0
234

गोंदिया: फिर्यादी रवींद्र पांडुरंग सुरसाउत, वय 40 वर्ष रा. रंजीत प्रेस जवळ कन्हारटोली, गोंदिया, हे परिवारासह बाहेरगावी गेले असता दिनांक- 26/07/2024 चे 22/00 वा.ते दिनांक 27/07/2024 चे 09/00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे राहते घराचे समोरील दाराचा कुलुप कोंडा तोडून बेडरूम मधील गोदरेज आलमारीतील लॉकर तोडून त्यामधून ठेवलेले सोन्याचे दागिने किंमती 54,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोलीस ठाणे रामनगर येथे अपराध क्रमांक 207/024 कलम 331(4), 305(A) भा. न्याय संहिता -2023 अन्वये दाखल करण्यात आले होते. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांचे देखरेखीखाली व मार्गदर्शनात करण्यात येत होता..रामनगर येथील डी. बी. पथक अज्ञात आरोपी व गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालाचे शोधात होते. रामनगर पोलीस पथक अज्ञात अरोपितांचा शोध घेत असताना पथकाने गुप्त बातमीदाराचे खात्रीशीर बातमीच्या आधारे गुन्ह्यात चोरी गेलेले मुददेमाल संबंधाने संशयित आरोपी रितिक उर्फ दद्दू प्रदीप वासनिक वय 22 वर्ष राहणार मलपुरी टेकरी तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया* यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने संबंधाने विचारपूस केली असता आरोपी यांने गुन्हा त्याचा इतर सहकारी नामे- हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके वय 23 वर्ष राहणार खैरलांजी रोड रेल्वे चौकी जवळ, गौतम बुद्ध, वॉर्ड तिरोडा याचे सोबत मिळून केल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची माहिती काढून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून विचारपूस दरम्यान त्याचे कडून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले दागिणे सोन्याची अंगुठी, नथ, मंगळसूत्राचे सोन्याचे पदक, एक जोडी बिरी, 8 नग गहूम़णी असा एकूण किंमती 45000/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. आरोपी  रितिक उर्फ दद्दू प्रदीप वासनिक वय 22 वर्ष राहणार- मलपुरी टेकरी, तालुका- तिरोडा जिल्हा- गोंदिया, हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके वय 23 वर्ष राहणार खैरलांजी रोड रेल्वे चौकी जवळ गौतम बुद्ध वॉर्ड, तिरोडा यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर, मॅडम पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पोहवा. सुनीलसिंह चौव्हाण, छत्रपाल फुलबांधे, राजेश भगत, कपिल नागपुरे, उमेश भानारकर, चालक संदीप घरोटे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here