Thursday, November 21, 2024
Google search engine
HomeUncategorized20 नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी सर्व आस्थापनांना सुट्टी

20 नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी सर्व आस्थापनांना सुट्टी

गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) नुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 24 ऑक्टोबर 2024 अन्वये खालील प्रमाणे आदेश देण्यात आले आहे.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापरात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments